Ad will apear here
Next
मोबाईक स्मार्ट सायकल शेअरिंग सेवा पुण्यात सुरू

मोबाईक स्मार्ट सायकल शेअरिंग सेवेच्या उदघाटनप्रसंगी विभोर जैन, रिकी केज, नरेंद्र साळुंखे, रविंद्र ढवळे, रामनाथ सुब्रमणियन आदी

पुणे : जगातील पहिल्या आणि सर्वात मोठ्या मोबाईक स्मार्ट सायकल शेअरिंग कंपनीने पुण्यात आपली सेवा सुरू केली आहे. पुणे महानगरपालिका आणि इतर स्थानिक प्रशासन एजन्सीजच्या सहकार्याने भारतात पहिल्यांदा मोबाईक स्मार्ट सायकल शेअरिंग सेवा सुरू झाली आहे. मोबाईक वापरकर्त्यांना कुठलेही डिपॉझिट न भरता २० मिनिटांच्या रायडींगसाठी १० रुपये, तर ९९ रुपयाच्या मासिक पास खरेदीवर अमर्यादित राइडस मिळणार आहेत. 

या वेळी मोबाईकचे आंतरराष्ट्रीय ऑपरेशन प्रमुख मार्क लिन म्हणाले, ‘आम्ही भारतात प्रथमच पुण्यात सेवा सुरू करून आनंदित आहोत. मोबाईकने जागतिक सायकल शेअरिंग संस्कृती विकसित करण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे. मोबाईककडे ९० लाखांपेक्षा अधिक सायकली असून, १६ देशांमधील २०० पेक्षा अधिक शहरांमध्ये आम्ही कार्यरत आहोत. पुण्यात आमची सेवा फक्त या प्रवासाची सुरुवात आहे. कोथरूडमध्ये मोबाईकची स्मार्ट सायकल शेअरिंग सेवा सुरु करण्यात आली आहे. सुमारे अडीच लाख लोकसंख्या असलेल्या, कोथरूडला सायकलिंगसाठी अनुकूल उपनगर म्हणून ओळखले जाते आणि येथे  राहणारे लोक फिटनेस-जागरूक आहेत.’

‘मोबाईक स्मार्ट सायकलमध्ये स्मार्ट लॉक तंत्रज्ञान, स्टेनलेस शाफ्ट ड्राइव्ह ट्रान्समिशन, ट्यूबलेस टायर, जीपीएस अशा अनेक सर्वोत्कृष्ट सोयी अनुभवायला मिळतील. वापरकर्ता मोबाईक अॅ्प डाऊनलोड करून जवळपासची मोबाईक शोधू शकतात आणि क्युआर कोड स्कॅन करत, अनलॉक करून राईडचा आनंद घेऊ शकतात. मोबाईकचे पेमेंट करताना ग्राहक नेट बँकिंग, कार्ड्स, वॉलेट व यूपीआय पेमेंट पध्दतीसारख्या अनेक डिजिटल पेमेंटसचा वापर करू शकतात’, असेही लिन यांनी नमूद केले.

मोबाईकचे सीबीओ सुजीथ नायर म्हणाले, ‘सायकलिंगसाठी पुणे शहरात विविध स्थळ असून, येथील वातावरण आणि पायाभूत सुविधा कंपनीचा विस्तार करण्यासाठी अतिशय योग्य आहे.’ 

पुणे प्रशासनाने २०१६ मध्ये वाहतूक पर्यावरणाला अनुकूल करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे सायकल योजना सुरू केली आहे. त्याला चालना देण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि मोबाईक यांनी एक सामंजस्य करार केला आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZMMBO
Similar Posts
पुणे शहरात स्वच्छ भारत अभियान पुणे : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे पुणे रिजनल आउटरीच ब्युरो, केंद्रीय आवास व शहरी विकास मंत्रालय आणि पुणे महानगरपालिका यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने पुणे शहरातील हडपसर, सिंहगड रोड आणि भवानी पेठ या तीन ठिकाणी १८, २० आणि २२ डिसेंबर २०१८ या दिवशी स्वच्छ भारत अभियान या विशेष जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
अंधशाळेत स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन उत्साहात साजरे पुणे : कोथरूड येथील ‘पूना स्कूल फॉर ब्लाइंड गर्ल्स’ संस्थेत गुरुवारी (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरे झाले. ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’ आणि ‘हेल्पिंग हँड’ संस्थेच्या वतीने येथील विद्यार्थिनींना झेंडे, फुगे, चॉकलेट आणि खाऊ देण्यात आला; तसेच या विद्यार्थिनींना शाळेसाठी उपयुक्त सँडलचे वाटप करण्यात आले
दुर्मिळ काडेपेट्यांचे प्रदर्शन पुणे : भारत, रशिया, जपान, जर्मनी व युरोपातील विविध देशांमधील तब्बल पाचशे जुन्या काडेपेट्या पाहण्याची संधी सध्या पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्ह’ अंतर्गत, कोथरूडमधील हॅपी कॉलनीतील पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.च्या दालनातील आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन सुरू झाले आहे.
पं. श्रीकांत देशपांडे यांच्या स्मरणार्थ ‘संगीत संध्या’ पुणे : सवाई गंधर्वांचे नातू व भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य व गायक पं. श्रीकांत देशपांडे यांच्या स्मरणार्थ ‘संगीत संध्या’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी शीला देशपांडे व पं. श्रीकांत देशपांडे मित्रमंडळ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language